पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १९१६ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२९८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १,१३,८१२वर तर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या ५९,९६६ वर पोहोचली आहे. दोन्ही महापालिकांच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

पुण्यात आज दिवसभरात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २,६६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १८३८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेर ९४ हजार ४५२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर, पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५५७ जण आज करोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ६० हजारांच्या उंबरठ्यावर असून ५९ हजार ९६६ वर पोहचली आहे. यांपैकी, ४५,७३२ जण करोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयातील सक्रिय रुग्णांची संख्या ६,२२२ एवढी आहे.