News Flash

पुण्यात दिवसभरात २३३ नवे करोनाबाधित, दोघांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात १४१ नवे करोनाबाधित, तिघांचा मृत्यू

संग्रहीत

पुणे शहरात दिवसभरात २३३ करोनाबाधित आढळले. तर, दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. शहारातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ लाख ७९ हजार ९६६ वर पोहचली आहे. तर, आजअखेर ४ हजार ६५४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ३४३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरातील १ लाख ७२ हजार ५८७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १४१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ७१ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९७ हजार १७५ वर पोहचली आहे. यापैकी ९३ हजार ७३८ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६९३ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील करोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच आहे. दररोज करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार १६० करोनाबाधित आढळले, तर ६४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत राज्यात २ हजार ८२८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ५० हजार १७१ वर पोहचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हीर रेट) ९४.८७ टक्के आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 8:54 pm

Web Title: in pune 233 new corona patients were found in a day msr 87 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुणे जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये खुली होणार
2 पुण्यात चाललंय काय? आणखी सात श्वानांचा मृत्यू; आतापर्यंत १९ श्वानांचे मृतदेह आढळले
3 पुण्यातला धक्कादायक प्रकार, बिल दिल्यानंतर हॉटेलच्या वेटरने ग्राहकाला घातला ९५ हजारांचा गंडा
Just Now!
X