पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ७५० करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला. आजच्या रुग्णवाढीमुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या २९ हजार १०७ वर पोहोचली आहे. तसेच आजअखेर ८७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ७२८ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १८ हजार ८२४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

तर पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने ५५७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ११ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर २८१ जण करोनामुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ८ हजार १७१ वर पोहचली असून यांपैकी ४,८७९ जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, करोनाची संख्या वाढत असल्याने आजपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.