News Flash

पुण्यात दिवसभरात २५८ नवे करोनाबाधित, ८ रुग्णांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये ११४ नवे रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू

संग्रहीत

पुणे शहरात दिवसभरात २५८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर १ लाख ७३ हजार १५५ एवढी एकूण करोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर आतापर्यंत ४ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात २५५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजअखेर १ लाख ६३ हजार ५५१ रुग्ण करोनामुक्त झाल्याची नोंद झालेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ११४ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. २९४ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ९३ हजार ९२८ वर पोहचली असून, यापैकी, ९० हजार ४७३ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७९४ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ५ हजारांपेक्षा अधिक जणांची करोनावर मात

राज्यात आज देखील करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात राज्यात ३ हजार ८२४ नवे करोनाबाधित आढळले, तर ५ हजार ८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. याशिवाय, ७० रुग्णांचा करोनामुळे दिवसभरात मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ६८ हजार १७२ वर पोहचली आहे.

मोठी बातमी!… राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

याशिवाय, राज्यातील करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.५२ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ७१ हजार ९१० असून, १७ लाख ४७ हजार १९९ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ हजार ९७२ वर पोहचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 8:42 pm

Web Title: in pune 258 new corona patients were added in a day 8 patients died msr 87 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ढगाळ स्थितीमुळे थंडी पुन्हा पळाली..
2 पश्चिम महाराष्ट्रातील खासगी साखर कारखान्यांची चौकशी
3 विस्कळीत शिक्षणातही अटल बोगद्याचे सहलस्वप्न
Just Now!
X