पुणे शहरात आज दिवसभरात करोनामुळे ३३ रुग्णांचा मृत्यू झाला तर १ हजार ७५१ नवे करोनाबाधित वाढले. याचबरोबर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४२ हजार ४६६ वर पोहचली.

आज अखेर शहरात १ हजार ६८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, करोनावर उपचार घेणार्‍या ८८३ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, या सर्वांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे आज अखेर २५ हजार १२९
रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात  आज लॉकडाउनच्या नवव्या दिवशी शहरातील बाधित रुग्णांनी ‘उच्चांकी’ आकडा पार केला. शहरात दिवसभरात एकूण ९२७  करोनाबाधित आढळले असून १५ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार १०७ वर पोहचली असून आत्तापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी संख्या आज करोनाबाधित रुग्णांनी गाठली आहे. यापैकी, आत्तापर्यंत ८ हजार ४० रुग्ण करोनामुक्त झाले असून आज २०३ जणांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३  हजार ३७९ झाली आहे.