पुणे शहरात आज दिवसभरात १ हजार ५७७ नवे करोनाबाधित आढळले तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर करोनाबाधितांची संख्या ८२ हजार १७० वर पोहचली आहे. आजअखेर १ हजार ९५० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ४२७ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६५ हजार ३४६ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १ हजार ६१ करोनाबाधित रुग्ण आढळले असून १३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज ९४६ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या ४० हजार ८९८ वर पोहचली आहे. यापैकी, २७ हजार १६६ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या ७ हजार ४२ एवढी असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.