करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढत आहे. करोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणात आता पुण्याने मुंबईला देखील मागे टाकले आहे. पुण्यात आज ३३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर १ हजार ६६९ नवे करोनाबाधित आढळले. करोनाबाधितांची एकूण संख्या आता ७९ हजार ३७ वर पोहचली आहे.

आजपर्यंत १ हजार ८८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ३८६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना आज घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर ६२ हजार ३४९ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १हजार १३१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३८ हजार ८२१ वर पोहचली आहे. आज ३७१ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २५ हजार ७७० जण करोनमुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या ६ हजार ६३१ अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.