पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ३८९ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ८५४ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ५०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १८३ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ७ हजार २६४ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले १२४ करोनाबाधित रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने १२४ करोनाबाधित रुग्ण आढळले. यात १७ रुग्ण हे महापालिकेच्या हद्दीबाहेरील आहेत. तर आज तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या १,६७६ वर पोहचली आहे. दरम्यान, आज ८३ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ५१ जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे.