पुणे शहरात आज दिवसभरात २ हजार ९३ नवे करोनाबाधित आढळल्याने, एकूण रुग्ण संख्या १ लाख ५ हजार ९०५ वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ५१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ५६९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ८६ हजार ९४० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात १ हजार ४१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून, सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, ९१३ जणांना आज डिस्चार्ज मिळाला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५५ हजार २३४ वर पोहचली आहे. पैकी, ४३ हजार ९८२ जण करोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार २२६ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. तब्बल २३ हजार ३५० नव्या करोनाबाधितांची आज नोंद झाली. तर ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ७ हजार २१२ वर पोहचली. तर, ७ हजार ८२६ जणांनी आज करोनावर मात केली आहे.