पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १९६८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ९२ हजार ८३९ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार २३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
करोनावर उपचार घेणार्या १६५७ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ७५ हजार १८४ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी १ हजार २४० जण करोनाबाधित रुग्ण आढळले असून १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १ हजार १६३ जण आज करोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ६६० वर पोहचली आहे.
यांपैकी, ३३ हजार २७२ जण करोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ७५६ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 29, 2020 9:21 pm