News Flash

पुण्यात दिवसभरात ७७४ नवे करोनाबाधित; दोन रुग्णांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरात ४२३ नवे करोना रुग्ण वाढले; एकाचा मृत्यू

संग्रहीत

पुणे शहरात दिवसभरात ७७४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता २ लाख २ हजार ७०२ वर पोहचली आहे. आतापर्यंत ४ हजार ८५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ४२७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ९२ हजार ९२८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ४२३ तर महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील २ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ३१९ जण करोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार ७०४ वर पोहचली आहे. यापैकी १ लाख ३९२ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९३६ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 8:34 pm

Web Title: in pune 774 new corona patients were added during the day msr 87 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक; परीक्षा रद्द
2 पुण्यात गतीमंद मुलीची हत्या; दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं
3 “संजय राठोडवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही”
Just Now!
X