पुण्यात आजारी वडिलांची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील तुपे वस्तीत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह तब्बल ३६ तास एका कपड्यात गुंडाळून ठेवला होता. गुरुवारी दुपारी ३ वाजता वडील मयत झाल्याची बातमी त्याने नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर त्याचा बनाव उघडकीस आला.

६७ वर्षीय रहीम गुलाब शेख हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांचं सर्व कुटुंबातील व्यक्तींना करावं लागत होतं. त्यांचा ३५ वर्षीय मुलाला मात्र याचं काहीच वाटत नव्हतं. नईम शेख हा रोज दारू प्यायलेल्या अवस्थेत असायचा. दारूच्या नशेत तो संपूर्ण गावभर हिंडायचा. त्यामुळे वडिलांची संपूर्ण जबाबदारी ही नईमच्या बहिणीवर आली होती. ती धुणीभांडी करून दोघांचा सांभाळ करत होती. मंगळवारी मध्यरात्री नईम नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आजारी वडिलांना मारहाण केली. तसेच “मै तुम्हे आझाद कर दुंगा” म्हणत आजारी वडिलांचा गळा आवळला. त्यानंतर ब्लेडच्या सहाय्याने गळा चिरला. यानंतर तब्बल ३६ तास मृतदेह एका कपड्यात घरातच गुंडाळून ठेवला. तसेच कुणालाही याची खबर ने देण्याची तंबी घरच्यांना दिली.

पिंपरी चिंचवड : KYC च्या नावाखाली तरुणीचे दीड लाख लुटले; QR Code, Links च्या माध्यमातून फसवणुकीत वाढ

गुरुवारी नईमने वडील मृत झाल्याची बातमी नातेवाईकांना सांगितलं. त्यानंतर नईम याची पत्नी सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आली. सासऱ्याचं अखेरचं दर्शन घेत असताना तिला त्यांच्या गळ्यावर व्रण दिसून आले. त्यानंतर तिने नईमच्या बहिणीला बाजूला घेऊन याबाबत चौकशी केली. तेव्हा तिने नईमने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर नईमच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी नईमला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे.