25 March 2019

News Flash

पुण्यात पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून, पती अटकेत

संजय पवार संशयित आरोपीचे नाव

प्रातिनिधिक फोटो

रोजच्या भांडणाला कंटाळून डोक्यात आणि चेहऱ्यावर हातोड्याचे घाव घालून पत्नीची हत्या केल्याचा प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. हडपसर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणुका संजय पवार (वय, ३०, रा. म्हसोबा मंदिराजवळ, हडपसर, पुणे) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी आरोपी संजय अर्जुन पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार दांपत्याचे सुमारे १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांमध्ये सतत भांडणे होत असत. त्यामुळे रेणुका पवार सातत्याने माहेरी जात असत. मंगळवारीही त्यांच्यात वाद झाला. हा वाद टोकाला पोहोचला व चिडलेल्या संजयने रेणुकाच्या डोक्यात आणि तोंडावर हातोड्याचे घाव घातले. यामध्ये रेणुकाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हडपसर पोलिसांनी संजयला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस निरीक्षक विष्णू पवार करत आहेत.

First Published on March 14, 2018 9:30 am

Web Title: in pune husband put a hammer on wifes head died