14 October 2019

News Flash

पुण्यात आयटी इंजिनिअरची १२ मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

पुण्यात आयटी इंजिनिअरने बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

पुण्यात आयटी इंजिनिअरने बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. वाकडच्या रॉयल रहाडगी ग्रीन सोसायटीमध्ये ही घटना घडली. रोहित बापूराव पाटील असं २८ वर्षीय इंजिनिअरचे नाव आहे.

आजारपणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. भाऊ कंपनीत गेल्यावर दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

मृत रोहित पाटील हा इलेक्ट्रीकल इंजिनिअर असून तो मूळचा धुळ्याचा आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. तो भाऊ आणि वहिनी सोबत राहात होता. गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. हिंजवडी मधील नामांकित कंपनीत रोहित कामाला होता. ज्यावेळी आत्महत्या केली तेव्हा घरात वहिनी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

First Published on April 18, 2019 2:36 pm

Web Title: in pune it engineer suicide