पुणे शहरात आज दिवसभरात ४६५ करोनाबाधित रुग्ण वाढले असुन, सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या आजअखेर १ लाख ९६ हजार ३८९ वर पोहचली आहे. आजपर्यंत ४ हजार ८१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज १८४ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत १ लाख ८९ हजार ४२१ जण करोनामुक्त झाले आहेत.

राज्यभरातील करोनाचा संसर्ग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे महापालिका सतर्क झाली असून नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. यानुसार, आता एका इमारतीत पाचपेक्षा अधिक करोनाबाधित रूग्ण आढळले तर ती संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे. तसेच, गृहविलगीकरणात असणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारले जाणार आहेत. यासह लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्यांवरही आता मार्शलची कडक नजर असणार आहे. तसेच, मुंबईतील गर्दीची ठिकाणांवर पालिकेची नजर असेल. करोनाविषयक नियम पायदळी तुडविणारी हॉटेल, तसेच मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Coronavirus : …तर संपूर्ण इमारत सील करणार; मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

राज्य सरकार देखील आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर पुन्हा लॉकडाउन देखील लागू केला जात आहे. राज्यभरात मागील २४ तासांत ५ हजार ४२७ नवे करोनाबाधित वाढले असुन, ३८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावरून करोनाचे संकट हळूहळू पुन्हा गडद होतं की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८१ हजार ५२० वर पोहचली आहे.

Coronavirus – राज्यात मागील २४ तासांत ५ हजार ४२७ करोनाबाधित वाढले, ३८ रुग्णांचा मृत्यू

दरम्यान, मागील २४ तासांमध्ये २ हजार ५४३ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. आतापर्यंत राज्यभरात १९ लाख ८७ हजार ८०४ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.५ टक्के आहे. तर, अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४० हजार ८५८ असून, आजपर्यंत करोनामुळे ५१ हजार ६६९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.