पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ७६१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या ६६ हजार ६२७ एवढी झाली तर आजवर एकूण १ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या १,४९९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्यासर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ५० हजार ११३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ७२१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यांपैकी ४२ जण हे ग्रामीण भागातील आहेत. तर १२ जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, ९४४ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील बाधितांची संख्या ३० हजारांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या २९ हजार ८३६ वर पोहचली असून यांपैकी, २१ हजार २०८ जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात ५ हजार १४६ सक्रिय रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.