पुण्यातील जुन्नर भागात मादी बिबट्याच्या दोन बछड्यांची तिच्यापासून ताटातूट झाली होती. मात्र हे दोन्ही बछडे आणि त्यांची आई यांची भेट घडवण्यात वन विभाग आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्राला यश आलं आहे.  पुण्याच्या लेण्याद्री आणि वडगाव आनंद या ठिकाणी हे बछडे सापडले होते.  जुन्नर परिसरातील वडगाव आनंद येथे ऊसतोड करत असताना मजुरांना बिबट्याचा बछडा सापडला होता.संबंधित घटनेची माहिती माणिकडोह बिबट निवारण केंद्राला देण्यात आली यावेळी डॉ.अजय देशमुख हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

व्हिडिओ

त्यांनी ज्या ठिकाणी बिबट्याचा बछडा सापडला होता त्याच ठिकाणी सुखरूप ठेवत असताना दुसरा कॉल हा लेण्याद्री येथून आल्याने देशमुख यांनी दोन वेगवेगळ्या टीम केल्या.त्यांनी त्या ठिकाणी जाऊन छोट्या बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेऊन ज्या ठिकाणी मिळाला होता त्याच ठिकाणी सुखरूप ठेवले. दोन्ही बछडे हे त्यांच्या आई ला रात्री ०९:१० आणि ०८:४० वाजता सुखरूप मिळाले आहेत. यानंतर वनविभाग आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्र यांचे कौतुक सर्वत्र होत आहे. बछडे मिळाले नाही तर मादी आक्रमक होते. त्यामुळे तिला बछडा मिळणं महत्वाचं असतं.ही कामगिरी डॉ.अजय देशमुख, बापू येळे, अजित शिंदे,महेंद्र यांनी कामगिरी केली.