News Flash

सोलापुरात मंदिरात युवकाचा गळा चिरून खून

विकासच्या गळ्यावर शस्त्राने वार केले.

मोडनिंब येथील श्रीपाद माऊली मठात शुक्रवारी दुपारी मृत विकास अनिल धोत्रे (वय २२, रा. मोडनिंब) हा बसला होता.

सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता. माढा) येथील श्रीपाद माऊली मठात एका २२ वर्षीय युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी घडली. विकास अनिल धोत्रे (वय २२, रा. मोडनिंब) असे मृत युवकाचे नाव आहे.

मोडनिंब येथील श्रीपाद माऊली मठात शुक्रवारी दुपारी मृत विकास धोत्रे  हा बसला होता. त्या ठिकाणी संशयित आरोपी गणेश सोनबा धोत्रे, दीपक सुनील धोत्रे (दोघे रा. मोडनिंब, ता. माढा) यांनी पूर्वीच्या भांडणातील राग मनात धरून विकासच्या गळ्यावर शस्त्राने वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत संशयित आरोपी यांच्यात डुक्कर मारण्यावरून सतत वाद होता. पोलिसांना घटनास्थळावर गुन्ह्यात वापरलेले साहित्य मिळाले. नितीन अनिल धोत्रे (वय १६ रा. मोडनिंब, ता. माढा) याने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 5:32 pm

Web Title: in the temple of solapur modnimb the young man murdered
Next Stories
1 धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; देहूरोड ते आकुर्डी दरम्यानची घटना
2 आजवर आठ मुख्यमंत्री पाहिले, आत्ताच आरोप कसे?; एकनाथ खडसेंचा सवाल
3 भोसरीत तरूणावर गोळीबार; शहरात २४ तासातील दुसरी घटना
Just Now!
X