News Flash

पिंपरी पालिकेला मिळकत करातून ५७७ कोटींचे उत्पन्न

पालिकेला भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या करसंकलन विभागाला गेल्या वर्षी करोनामुळे फटका बसला.

पिंपरी : पिंपरी महापालिकेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात मिळकत कराच्या माध्यमातून ५७७ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १०० कोटी रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.

पालिकेला भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या करसंकलन विभागाला गेल्या वर्षी करोनामुळे फटका बसला. पालिका सभेने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ८७० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात ३१ मार्चअखेर या विभागाने ५७७ कोटींचा टप्पा ओलांडला. त्याआधी २०१९-२० या वर्षात या विभागाला ७५० कोटींचे उद्दिष्ट होते, तेव्हा ४८७ कोटी ७६ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा तुलनात्मकदृष्ट्या १०० कोटींचे जास्त उत्पन्न मिळाले. एकूण उत्पन्नातील २४८ कोटी रकमेचा भरणा नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने केला आहे. मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबवली. त्या अंतर्गत ३५ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली. सर्वाधिक ११५ कोटींचे उत्पन्न थेरगाव विभागातून तर सर्वांत कमी ६ कोटींचे उत्पन्न पिंपरीनगर विभागातून पालिकेला मिळाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:02 am

Web Title: income of rs 577 crore from income tax to pimpri municipality akp 94
Next Stories
1 …. तरीही प्रक्रिया प्रकल्प अपुरेच
2 पुणे-दौंड मार्गावर विजेवरील मेमू लोकल
3 खाटांसाठी दररोज सरासरी २ हजार ३०० दूरध्वनी
Just Now!
X