27 November 2020

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये कर्जाला कंटाळून आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या

बबलूकुमार चंद्रेश्वर प्रसाद हे आकुर्डी येथे राहत. त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात कर्ज झाले होते. अनेकांकडून त्यांनी पैसे उसने घेतले होते.

प्रातिनिधिक छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बबलूकुमार चंद्रेश्वर प्रसाद (वय ३२, रा. आकुर्डी) असे आत्महत्या केलेल्या आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे. आजारपण आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलूकुमार चंद्रेश्वर प्रसाद हे आकुर्डी येथे राहत. त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात कर्ज झाले होते. अनेकांकडून त्यांनी पैसे उसने घेतले होते. त्यातील मित्रांचे देणे त्यांनी फेडले. पण नातेवाईकांचे पैसे द्यायचे राहिले होते. याच तणावातून बबलूकुमार यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत बबलूकुमार यांनी आजारपणात सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आकुर्डी येथील घरात ते आईबरोबर राहत. दोन वर्षांपूर्वी आजारपणात त्यांचे पाय निकामी झाल्यामुळे ते काढण्यात आले होते. वाढते कर्ज आणि पाय गेल्याने त्यांनी विवाह देखील केला नव्हता अशी माहिती समोर येत आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 2:14 pm

Web Title: income tax officer committed suicide in akurdi
Next Stories
1 VIDEO – पुण्यात हॉटेलमध्ये घुसली फॉर्च्यूनर कार, वेटरचा मृत्यू
2 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; नादुरूस्त कारला धक्का देताना टेम्पोने उडवले, पाच जण ठार
3 राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत
Just Now!
X