News Flash

आयकर कार्यालये शनिवार व रविवारी सुरू राहणार

ज्येष्ठ नागरिकांना परताव्याची पावती देण्यासाठी आवश्यक ठिकाणी वेगळ्या काऊंटरची सोयही केली जाणार आहे.

| July 26, 2014 02:55 am

प्राप्तिकराचा (आयकर) परतावा भरणाऱ्यांच्या सोईसाठी आयकर कार्यालये २६ आणि २७ जुलै (शनिवार व रविवार) रोजी कार्यालयीन वेळात सुरू राहणार आहेत. हा परतावा भरण्यासाठीची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.
आयकर खात्याच्या अतिरिक्त आयुक्त एकता विश्नोई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवार व रविवारी कार्यालये खुली ठेवण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना परताव्याची पावती देण्यासाठी आवश्यक ठिकाणी वेगळ्या काऊंटरची सोयही केली जाणार आहे. २६, २७, २८, ३० आणि ३१ जुलैला ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल. या सर्व दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात प्राप्तिकर परतावा स्वीकारला जाईल.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 2:55 am

Web Title: income tax offices last date
टॅग : Income Tax
Next Stories
1 सक्षमीकरणाच्या अटीवर पीएमपीला टोलमाफी द्या
2 माझ्या कामात कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती – द. भि.
3 …तरच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई – गृहमंत्री
Just Now!
X