News Flash

Video : ‘तिरंगी’ धबधबा तुम्ही पाहिलात का?

पोलिसांच्या कल्पनेतून नयन रम्य दृष्य साकारले

स्वातंत्रदिन साजरा करण्याची  पोलिसांची ही कल्पना भन्नाट अशीच होती.

देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसत असून देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. राज्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल, गेट वे ऑफ इंडिया याठिकाणी विद्युत रोषणाईची झगमग पाहायला मिळत असताना मावळ तालुक्यातील धबधबा तीन रंगात वाहताना दिसला.

मावळ तालुक्यातील भाजे लेणी येथील धबधब्याला तिरंग्याच रूप देण्यात आलं होत. स्वातंत्र्यदिनानिमित्त धबधबा परिसरात बंदोबस्तासाठी तैणात  पोलिसांच्या कल्पनेतून  धबधबा तीन रंगात वाहताना दिसला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कल्पनेला पर्यटकांनीही दाद दिल्याचे पाहायला मिळाले. तीन रंगात वाहणाऱ्या धबधब्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात पर्यटक दंग झाले होते.

तळेगाव एमआयडीसी आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी भाजे लेणी येथील धबधब्याजवळ पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर, पोलीस हवालदार ठोंबरे, महिला पोलीस शिपाई खेडकर, या सर्वांना बंदोबस्तासाठी तैणात केले. धबधब्यावरून पडणारे पाणी पाहून या सर्वच पोलीस कर्मचाऱ्याना कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी धबधब्याच्या पाण्यात केशरी आणि हिरवा हा रंग सोडत एक नयन रम्य दृष्य तयार केले.  या दृष्याचा तीन ते चार हजार पर्यटकांनी आनंद घेतला. एवढेच नाही तर काहींनी तीन रंगात वाहणाऱ्या धबधब्याला कॅमेऱ्यात कैदही केले. काहींनी व्हाट्सअॅपचे स्टेट्स म्हणूही हा व्हिडिओ ठेवला आहे. त्यामुळे स्वातंत्रदिन साजरा करण्याची  पोलिसांची ही कल्पना भन्नाट होती, असेच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2017 6:03 pm

Web Title: independence day 2017 tricolour bhaje leni waterfall in maval
Next Stories
1 स्वातंत्र्यदिनी सामाजिक बांधिलकी जपणारी ‘आर्मी’
2 पुण्यात स्वातंत्र्यदिनी सुकाणू समितीचे आंदोलन
3 महापौरांचे लग्न अन् मुख्यमंत्र्यांची कोपरखळी
Just Now!
X