News Flash

पिंपरी पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार आजपासून

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची अधिसूचना राज्य शासनाने काढली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पिंपरीचे पोलीस आयुक्तालय बुधवारपासून सुरू होत असले तरी अद्यापही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामकाजासाठी कार्यालय उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची कार्यालयासाठी वणवण सुरूच आहे. कार्यालयाच्या शोधात असलेले पोलीस आयुक्त आर. के.पद्मनाभन यांनी प्राधिकरण इमारतीच्या सहाव्या मजल्याची मागणी प्राधिकरणाकडे केली होती. मात्र हा मजला यापूर्वीच पीएमआरडीएला भाडय़ाने दिलेला असल्यामुळे प्राधिकरणाने ही जागा देण्यास असहमती दर्शविली आहे. त्यामुळे तूर्त ऑटो क्लस्टर येथून कामकाज केले जाणार आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची अधिसूचना राज्य शासनाने काढली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालयासाठी जागेची पाहणी करत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने पोलीस आयुक्तालयासाठी प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील महापालिका शाळेची इमारत, निगडी येथील महापालिका शाळेची इमारत आणि चिंचवड येथील व्यापारी संकुलातील पहिला मजला देण्यास मंजुरी दिली आहे. या तीनही ठिकाणचे फर्निचर तसेच रंगरंगोटीचे काम सुरु असल्याने १५ ऑगस्टपासून एकही इमारत पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजासाठी वापरता येणार नाही.

पोलीस आयुक्तांनी आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पिंपरी प्राधिकरणाच्या इमारतीची पाहणी केली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची भेट घेऊन इमारतीमधील सहावा मजला उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, तो मजला देण्यास असहमती दर्शवली. पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू करण्यात अनेक अडचणी असल्या तरी पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू करण्याचा मानस पोलीस आयुक्तांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:22 am

Web Title: independent governance of pimpri police commissioner
Next Stories
1 गंमतघरातून विद्यार्थ्यांना शिक्षणप्रेरणा
2 कौटुंबिक न्यायालयातील पार्किंगचा तिढा कायम!
3 महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ‘मेकॅट्रॉनिक्स’
Just Now!
X