आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आता शस्त्रक्रियेची पद्धत देखील तितकीच दिवसेंदिवस अत्याधुनिक होत असल्याने शस्त्रक्रिया अधिक सहज झाली आहे. अत्याधुनिक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात पुण्याच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा खोवला गेला. पुण्यात गुरूवारी रात्री देशातील पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

सोलापूरच्या २१ वर्षीय तरूणीला जन्मत:गर्भाशय नव्हता. त्यामुळे तिच्या आईने तिला गर्भाशय दान करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून गर्भाशय प्रत्यारोपण करणारे पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालय हे देशात पहिलं रुग्णालय ठरलं आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

”सोलापूरच्या एका २१ वर्षीय तरूणीला जन्मत: गर्भाशय नाही. याचे निदान यापूर्वीच झाले होते. तरुणीला तिची आई गर्भाशय दान करणार होती. त्यानुसार आज दुपारी १२ वाजता शस्त्रक्रियेला सुरूवात झाली. तब्बल ९ तासांनी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. सुरुवातीला तरुणीच्या आईचे गर्भाशय दुर्बिनीद्वारे काढण्यात आले. त्यानंतर ते गर्भाशय तरूणीवर प्रत्यारोपण करण्यात आले.”, अशी माहिती डॉ. मिलींद तेलंग यांनी दिली.

गर्भाशय काढण्यासाठी ४ तास तर प्रत्यारोपण करण्यासाठी ५ तासांचा कालावधी लागला. तरुणी आणि तिच्या आईची तब्येत चांगली असून तरूणीला पुढील २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.