News Flash

हुतात्मा मेजर नायर यांना भावपूर्ण निरोप

पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात हुतात्मा झालेले मेजर शशिधरन नायर यांच्या पार्थिवावर रविवारी वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता.

पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

‘अमर रहे.. मेजर शशी नायर अमर रहे’.. ‘भारत माता की जय’.. ‘हिंदुस्तान जिंदाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद’.. ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत हुतात्मा मेजर शशिधरन नायर यांना रविवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. मेजर नायर यांना सलाम करण्यासाठी हजारो पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीत गर्दी केली होती. नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात शुक्रवारी (११ जानेवारी) हुतात्मा झालेल्या मेजर शशिधरन विजय नायर यांच्या पार्थिवावर वैकुंठ  स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

खडकवासला येथील नायर यांच्या घरापासून सजवलेल्या ट्रकमधून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. अकराच्या सुमारास ही अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचली. आजी-माजी लष्करी अधिकारी,  पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर मेजर नायर यांची आई लता, पत्नी तृप्ती, बहीण, अन्य नातेवाइक आणि मित्र परिवाराने साश्रूनयनांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

लष्कर आणि पोलिस पथकाने सलामी दिल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी मेजर नायर यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज नायर कु टुंबीयांकडे सुपूर्द केला. नायर यांचा मावसभाऊ  अश्वत याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. लष्करी पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडत मेजर नायर यांना अखेरची मानवंदना दिली.

पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार भीमराव तापकीर, अभय छाजेड, श्रीकांत शिरोळे, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील अधिकारी, तिन्ही संरक्षण दलांचे प्रतिनिधी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार या वेळी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:50 am

Web Title: indian army pays tributes to major nair
Next Stories
1 पुणे : दोन गटात तुफान राडा, सराईत गुन्हेगाराचा सपासप वार करुन खून
2 पिंपरी : आठवलेंच्या पत्रकार परिषदेनंतर कार्यकर्ते, पोलीस आणि पत्रकार थोडक्यात बचावले
3 पिंपरी चिंचवड : ‘डीपी’ला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू
Just Now!
X