भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांची नुकतीच पुण्यात भेट झाली. भारतीय संघ सध्या पुण्याच्या गहुंजे मैदानावर कसोटी सामना खेळतोय. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर विराट आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भेट झाली, या भेटीदरम्यान विराटने संभाजी महाराजांकडे रायगड किल्ला पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बीसीसीआयच्या निवड समितीचे सदस्य जतीन परांजपे यांनी विराट आणि संभाजी महाराज यांची भेट घडवून आणली. यावेळी संभाजी महाराजांनी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांविषयी करत असलेल्या कामाची मागणी केली. ज्यानंतर विराटने स्वतः संभाजी महाराजांकडे रायगड पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुणे येथील कसोटी सामन्यात विराट कोहलीने नाबाद २५४ धावांची द्विशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर जमा केले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian captain virat kohli meets mp chatrapati sambhaji maharaj desire to visit raigad psd
First published on: 13-10-2019 at 11:10 IST