ऑडिशनच्या नावाखाली कलाकारांची फसवणूक होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशातून यापुढे मराठी चित्रपटांच्या ऑडिशनसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची परवानगी बंधनकारक करण्यात येणार आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये सध्या मराठी चित्रपटांच्या ऑडिशन होत आहेत. यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून नवोदित कलाकारांना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच ज्येष्ठ रंगकर्मी यांनाही हा अनुभव येतो. आपण चित्रपटाचे निर्माते आणि निर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक असल्याचे भासवून पैसे उकळले जातात. नव्या कलाकारांना मात्र डोकेदुखी सहन करावी लागते. बनावट ऑडिशनच्या नावाखाली फसवणूक होण्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांगितली. चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका देण्याचे आमिष दाखवून नवोदित कलाकारांना लुटण्याचे प्रकार घडत असल्याने महामंडळाने ऑडिशनसाठी परवानगी घेणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागामध्ये असे प्रकार वारंवार घडू लागल्याने तेथील स्थानिक कलाकारांनी भीती व्यक्त केली आहे. निर्माते आणि दिग्दर्शक कलावंतांचा शोध घेण्याच्या उद्देशातून ऑडिशन घेतात. यापुढील काळात त्यांना राज्याच्या कोणत्याही भागात ऑडिशन घेण्यासाठी महामंडळाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. महामंडळाच्या शनिवारी (१८ जून) होणाऱ्या बैठकीमध्ये या विषयावर विस्तृत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद