News Flash

भारतीय छात्र संसद २७ ते ३० जानेवारीदरम्यान

‘भारतीय छात्र संसद’ हा उपक्रम २७ ते ३० जानेवारी दरम्यान होणार असून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर आदी उपस्थित राहणार आहेत.

माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटकडून आयोजित करण्यात येणारा ‘भारतीय छात्र संसद’ हा उपक्रम २७ ते ३० जानेवारी दरम्यान होणार असून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती छात्र संसदेचे समन्वयक राहुल कराड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्यातर्फे भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी २७ ते ३० जानेवारी दरम्यान छात्रसंसद होणार आहे. छात्रसंसदेचे हे सहावे वर्ष आहे. यावर्षी राजकीय, सामाजिक विषयांवरील ९ सत्रे होणार आहेत. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी, संसदीय कामकाज मंत्री व्यंकैय्या नायडू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, युवक कल्याण व क्रीडा केंद्रीय राज्यमंत्री सर्वानंदा सोनावाल, पंतप्रधानांचे माजी सल्लागार  डॉ. सॅम पित्रोदा, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, डॉ. किरण बेदी, आम आदमी पक्षाचे डॉ. कुमार विश्वास, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार सीताराम येच्युरी, अर्णब गोस्वामी, राकेश ओमप्रकाश मेहरा, आशुतोष गोवारीकर, खासदार परेश रावल आदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याबाबत अधिक माहिती www.bhartiyachhatrasansad.org येथे मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2016 3:18 am

Web Title: indian students parliament at mit school
Next Stories
1 नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या तरूणांची पोलिसांनी केली चौकशी
2 दिल्ली फारच जवळ आहे!
3 हिंजवडीचा प्रवास नको रे बाबा !
Just Now!
X