22 September 2020

News Flash

माहिती तंत्रज्ञान विषय प्रशिक्षकांचे उपोषण

राज्यातील शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारणे आणि माहिती तंत्रज्ञान विषयाचे शिक्षण सुरू करणे

राज्यातील शाळांमध्ये संगणक प्रशिक्षणासाठी आखण्यात आलेल्या आयसीटी योजनेचा दुसरा टप्पा संपल्याने माहिती तंत्रज्ञान विषय शिकवणाऱ्या अडीच हजार प्रशिक्षकांवर बेरोजगारीची वेळ आल्याचा दावा या प्रशिक्षकांच्या संघटनेने केला आहे. शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. राज्यातील शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारणे आणि माहिती तंत्रज्ञान विषयाचे शिक्षण सुरू करणे यासाठी शासनाने आयसीटी योजना आखली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने खासगी कंपन्यांबरोबर करार केला. या योजनेअंतर्गत आता ८ हजार प्रशिक्षक काम करत आहे. या योजनेचा दुसरा टप्पा महिना अखेरीस संपणार आहे. त्यामुळे या कंपन्यांबरोबरचे करारही संपणार असल्यामुळे अडीच हजार प्रशिक्षकांचे काम जाणार असल्याचा दावा संघटनेने केला आहे. नियमित सेवेत रुजू करून घ्यावे या मागणीसाठी या प्रशिक्षकांनी ‘महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ’ स्थापन केला असून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2016 1:16 am

Web Title: information technology subject coach on hunger strike
टॅग Hunger Strike
Next Stories
1 मद्याच्या विक्रीतून तब्बल १,५६४ कोटींचा महसूल
2 चिमुकल्या भाचे मंडळींची मामाच्या गावची सफर रंगली
3 विद्यार्थी सुधारित प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेतच
Just Now!
X