महाड येथील पुलाच्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर, िपपरी-चिंचवड शहरातील सर्व पुलांची क्षमता तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. िपपरी-चिंचवड शहरातील अनेक उड्डाणपूल अतिशय जुने झाले आहेत.  दापोडी येथील रेल्वेवरील पूल तसेच जुना हॅरिस पूल इंग्रजांच्या काळात बांधलेले आहेत. महाड येथे मंगळवारी मध्यरात्री सावित्री नदीवरील पूल कोसळला.

या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी िपपरी पालिका आयुक्तांनी शहरातील सर्व पुलांची क्षमता तपासणी करावी व त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश प्रशासनाला दिले. तूर्त शहरातील कोणताही पूल धोकादायक अवस्थेत नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.