News Flash

प्रेरणादायी : ९० वर्षीय आजीबाईंची करोनावर मात; कुटुंबीयांनी केले जंगी स्वागत

अनेकांच्या मनातील करोनाविषयीची भीती कमी होण्यास मदत

पिंपरी : येथील ९० वर्षीय मुक्ताबाई पांचाळ या आजीबाईंनी करोनावर यशस्वीरित्या मात केली.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधितांची संख्या ८ हजारांच्या वर पोहचली आहे. दररोज शेकडो जण बाधित आढळत आहेत. या दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील मुक्ताबाई हिरामण पांचाळ या ९० वर्षीय आजीबाईंनी करोनाच्या आजारावर मात केली असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्जही देण्यात आलेला आहे. या आजीबाई बऱ्या होऊन घरी परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह शेजाऱ्यांनी परिसरात रांगोळी काढून, फुलांचा वर्षाव करीत टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.

प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मुक्ताबाई पांचाळ यांनी करोनावर मात केली आहे. त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलामुळे त्यांना करोनाची बाधा झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. डिस्चार्ज दिल्यानंतर राहत असलेल्या ठिकाणी स्थानिक आणि घरातील व्यक्तींनी त्यांचे जंगी स्वागत केले. तर घरातील व्यक्तींनी औक्षण करून प्रोत्साहन दिले.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मात्र, रुग्ण वाढत असले तरी शेकडो जण करोनामुक्तही होत आहेत. दरम्यान, करोनाविषयी नागरिकांच्या मनात अधिकच भीती असल्याचे अनेकदा समोर आले आहे. परंतु, काही महिन्यांच्या नवजात बालकापासून ९० वर्षांच्या वृद्ध व्यक्तींनी करोनाच्या आजारावर मात केली आहे. यामुळे आता करोनाविषयीची ही भीती कमी होण्यास मदत होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 2:28 pm

Web Title: inspirational 90 year old grandmother overcomes corona a warm welcome from the family aau 85 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये 175 लहानग्यांची करोनावर मात, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश
2 टाळेबंदी लागू; शहरात शुकशुकाट
3 अवघ्या तीन दिवसांत २५ कोटी रुपयांची मद्यविक्री
Just Now!
X