31 October 2020

News Flash

पुण्याचा नवा ‘गोल्डमॅन’! अंगावर बाळगतो तब्बल ५ किलो सोनं

स्वत:च्या हिंमतीवर कमावली संपत्ती

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी सोनं परिधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत पुण्यातील एक तरूण दीड कोटी रूपयांचं सोनं परिधान करत आहे. या तरूणाचे नाव प्रशांत सपकाळ असे आहे. सोशल मीडियावर त्याला गोल्डमॅन म्हणून ओळखलं जातं. तब्बल पाच किलो वजनाचे सोनं परिधान करून दररोज प्रशांत वावरताना दिसतात. प्रशांत यांना ऐवढं सोनं परिधान करण्याची प्रेरणा बप्पी लहरी यांच्याकडून लहानपणी मिळाली. सध्या बप्पी लहरीपेक्षा जास्त सोनं प्रशांत परिधान करतात.

पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात प्रशांत यांचा जन्म झाला. त्यानंतर प्रशांत यांनी स्वतचा व्यवसाय सुरू केला आहे. प्रशांत सामाजिक कार्यातून गोरगरिबांना मदतही करतात.

प्रशांत दररोज सोन्याची चैन, लॉकेट, ब्रेसलेटच्या स्वरूपात एकूण पाच किलो सोनं अंगावर परिधान करतात. प्रशांत यांना सोन्याची आवड आहे. स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशांत यांनी भरपूर कष्ट घेतले. सोशल मीडियावर प्रशांत यांचा चांगलाच बोलबाला असल्याचे पहायला मिळतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 4:37 pm

Web Title: inspired by bappi lahiri pune man dons 5 kgs gold worth rs 1 5 crores see pics nck 90
Next Stories
1 ‘अमित शाह म्हणाले, भारत विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार’
2 VIDEO: व्याघ्र प्रकल्पातच वाघ असुरक्षित, जीव धोक्यात टाकून ओलांडावा लागतो रस्ता
3 उघड्या गटाराला पोलिसाने दगडाने झाकलं, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
Just Now!
X