23 January 2021

News Flash

‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या प्रकाशनानिमित्त गुंतवणूकदारांशी संवाद

‘लोकसत्ता अर्थब्रह्म २०२०-२१’ या वार्षिकांक प्रकाशनाचे यंदाचे सातवे वर्ष आहे.

पुणे : दरवर्षीचा अर्थसंकल्प प्रत्येकाच्या मासिक अर्थव्यवस्थापनावर परिणाम करीत असतो. अशा वेळी गुंतवणूक, बचत नेमकी कशात करायची? सोने की जमीनजुमला? म्युच्युअल फंड की थेट समभाग? असे अनेक प्रश्न आणि समस्यांवर एकच उत्तर म्हणजे ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ हा वार्षिकांक.. त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुण्यात ६ मार्चला अर्थविषयक तज्ज्ञ गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणार असून, गुंतवणुकीबाबतच्या विविध शंकांचे निरसन करणार आहेत.

अर्थसंकल्प, त्यातील तरतुदी, त्याचे परिणाम आदींविषयीच्या विवेचनासह आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक असलेल्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म २०२०-२१’ या वार्षिकांक प्रकाशनाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. त्या निमित्ताने आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम, ६ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५.४५ वाजता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, एमईएस सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड  येथे होत आहे. विजया ग्रुप आणि फाइव्हब्रिक रिअ‍ॅल्टी प्रा. लि. या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर, तर अपना सहकारी बँक लि. बँकिंग पार्टनर आहेत.

वसंत माधव कुळकर्णी हे या कार्यक्रमात ‘गुंतवणुकीत समभाग का हवेत?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ‘गुंतवणुकीचे जोखीम व्यवस्थापन’ या विषयावर श्रीकांत कुवळेकर, तर ‘गुंतवणुकीतून कर नियोजन’ या विषयावर करसल्लागार चिंतामणी देशपांडे यांचे मार्गदर्शन गुंतवणूकदारांना मिळणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

कधी? : शुक्रवार, ६ मार्च, सायंकाळी ५.४५

कुठे? :  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, बाल शिक्षण मंदिर, एमईएस सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड

मार्गदर्शक

* गुंतवणुकीत समभाग का हवेत?- वसंत माधव कुळकर्णी

* गुंतवणुकीचे जोखीम व्यवस्थापन- श्रीकांत कुवळेकर

* गुंतवणुकीतून कर नियोजन- चिंतामणी देशपांडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 5:08 am

Web Title: interaction with investors on the release of loksatta arthbrahma zws 70
Next Stories
1 The Best Good Luck : दहावीची परीक्षा आजपासून
2 ‘आयटीआय’कडे विद्यार्थिनींचा कल वाढतोय
3 नगरसेवकांच्या हाती ८५० कोटी!
Just Now!
X