पुण्यातील महापालिकेच्या विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूकडून कबड्डीचे धडे मिळणार आहेत. २०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किशोरी शिंदे यांची महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. महापालिकेत पदभार स्वीकारताच महापालिकेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना खेळासाठी मार्गदर्शन करणार असून तरुणींनीदेखील खेळाकडे वळावे, अशी भावना किशोरी शिंदेंनी व्यक्त केली आहे.

भारतामध्ये क्रिकेटला मोठे ग्लॅमर आहे. त्यामुळे इतर खेळांकडे कायम दुर्लक्ष केले जाते. मात्र विविध स्पर्धांमुळे सध्या कबड्डीसारख्या मातीमधील खेळाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे, असे किशोरी शिंदे यांनी म्हटले आहे. ‘लहानपणापासूनच कबड्डीची आवड होती. माझी जिद्द आणि चिकाटी पाहून आई-वडिलांनी कायमच प्रोत्साहन दिले,’ असे सांगताना किशोरी शिंदे यांनी अभ्यासालादेखील कायम प्राधान्य दिल्याचे म्हटले.

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Mumbai, Cyber ​​fraud, Taddeo,
मुंबई : ताडदेवमधील आंतराष्ट्रीय शाळेची ८७ लाखांची सायबर फसवणूक, सायबर पोलिसांना ८२ लाख रुपये गोठवण्यात यश
Drug supply to Delhi
अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा
Office of ED and National Investigation Agency in BKC mumbai
ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला

‘कोणत्याही दुखापतींनी न डगमगता कबड्डीतील प्रवास सुरू ठेवला. त्यामुळे २००६ मध्ये राज्य शासनाच्या वतीने रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. यानंतर २०१० मध्ये एमबीए करण्याचा निर्णय घेऊन त्यात प्रथम श्रेणी घेतली,’ असे सांगताना किशोरी शिंदे यांनी अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘२०१३ मध्ये रेल्वेच्या सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर २०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने आयुष्याला कलाटणी मिळाली,’ असे सांगत किशोरी शिंदे यांनी त्यांच्या क्रीडा कारकिर्दीचा पट उलगडला.

‘कुटुंबाने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आज इथपर्यंत पोहोचू शकले. काही खेळाडूंमध्ये चांगले गुण असतात. मात्र त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे येत्या काळात महापालिकेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्याचे काम करणार आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून खेळाचे धडे मिळाले तरच त्यांना पुढे जाण्याची संधी मिळते. यातून पुण्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यास मदत होईल,’ असे म्हणत किशोरी शिंदे यांनी खेळाडू घडवण्याचा मानस व्यक्त केला.