विनायक निम्हण, शिवसेना

Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट
bachchu kadu shinde fadnavis
“…त्या गोष्टीचा बदला घेतला पाहिजे, त्यांना दणका देणार”, बच्चू कडूंचा महायुतीविरोधात शड्डू? लोकसभेला उमेदवार उभे करणार?
congress kisan morcha national coordinator shailesh agarwal meet mallikarjun kharge over wardha seat
“एकाही वरिष्ठ नेत्याने वर्धेची जागा काँग्रेसने लढावी म्हणून स्वारस्य दाखविले नाही,” कोण म्हणाले असे पक्षाध्यक्ष खर्गे यांच्यासमोर?

आगामी निवडणुकीसाठी युती होणार का?

महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ती पक्ष प्रमुखांपर्यंत पोहोचविली आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ऐनवेळी युती तोडण्याचा निर्णय झाला. ही बाब लक्षात घेता स्वबळावरच लढावे, अशीच आग्रही मागणी होत आहे. भाजप-सेनेची युती होईल, अशी चर्चा होत आहे. प्रस्ताव दिल्याचेही सांगितले जात आहे. मात्र त्यात सत्यता नाही. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. एवढीच बाब खरी आहे. फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.

महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून केलेली कामगिरी कशी होती?

एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेहमीच योग्य भूमिका घेतली. नागरी प्रश्न, शहर विकास याच मुद्यांवर आम्ही लढलो. त्या वेळी भाजप असो की राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, त्यांनी काय आणि कोणती भूमिका घेतली हे आम्ही पाहिले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपच्या छुप्या आघाडीलाही आम्ही बळी पडलो नाही. नागरिकांशी बांधिलकी ठेवूनच आम्ही काम केले. सत्तेशी आम्ही कधीच बांधिलकी ठेवली नाही.

नागरिकांच्या दृष्टिकोनातून काय केले?

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या सत्तेत शहराचा विकास झाला नाही. त्यांच्याकडे नियोजन नव्हते. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही त्यांना शहरासाठी काहीही करता आले नाही. त्याउलट नागरी प्रश्नांवर आम्ही सातत्याने आवाज उठविला. आंदोलने केली. सार्वजनिक वाहतुकीसाठी तसेच पाणीपट्टी आणि मिळकत करातील वाढीच्या पाश्र्वभूमीवर आंदोलने झाली.

भाजप हा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी आहे का?

नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हाच आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी असेल. मात्र भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शहर विकासातील प्रमुख अडसर ठरले आहेत. भाजपकडून शहराबाबत दुजाभाव करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसकडे कोणतेही नियोजन नाही. याच बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचा दुजाभाव जनतेपुढे मांडतानाच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचा नियोजनशून्य कारभारही अधोरेखीत करण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षातील वातावरण कसे आहे?

तब्बल सातशेहून अधिक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यावरूनच वातावरणचा अंदाज येतो. अन्य पक्षातून भाजपमध्ये पक्षांतर होत असतानाही एकही शिवसैनिक पक्ष सोडून गेलेला नाही. महापालिकेत सत्ता मिळवायची हीच सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षात चैतन्य, उत्साह असून निवडणुकीसाठीची सर्व आखणी पूर्ण झाली आहे. स्पष्ट धोरणे आणि उद्दिष्टांमुळेच शिवसेनेवर निश्चित विश्वास ठेवतील, यात शंका नाही.

पक्ष पातळीवरील तयारी पूर्ण झाली आहे का?

निवडणुकीच्या आधीपासूनच संघटनात्मक बांधणी करण्यात आली होती. युवा सेना, महिला आघाडय़ा यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. तरुणांना सहभागी करून घेतले आहे. शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे, ज्याने मतदार याद्यांवर गटप्रमुख आणि यादी प्रमुखांची नियुक्ती केली आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होईल?

पक्षाचा जाहीरनामाही महिना अखेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. लोकसहभाग हेच जाहीरनाम्याचे प्रमुख वैशिष्टय़ असेल. याशिवाय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या सतरा किंवा अठरा जानेवारी रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचेही नियोजन करण्याची तयारी सुरू आहे.