News Flash

कोट्यवधींची खरेदी संगनमताने

मार्च २०२० पासून करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या वर्षी १२ मार्चला शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला.

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदारांचा सहभाग

पिंपरी : करोना साथरोगाच्या संकटकाळात जीवनमरणाचा विषय ऐरणीवर असतानार्ही पिंपरी महापालिकेत विविध प्रकारच्या खरेदीत संगनमताने कोट्यवधींचे साटेलोटे सुरू आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदारांचा यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग दिसून येत आहे. मर्जीतील माणसाला ठेका मिळावा, यासाठी प्रचलित नियमावली सोयीस्करपणे पायदळी तुडवण्यात आली असली तरी सर्वकाही नियमानुसार होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

मार्च २०२० पासून करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या वर्षी १२ मार्चला शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला. सद्याच्या स्थितीत अर्थात १३ महिन्यांच्या कालावधीत शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा दोन लाखांहून अधिक झालेला आहे. महापालिकेने करोनासाठी आतापर्यंत जवळपास ३०० कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. अजूनही मोठी रक्कम करोना कामांसाठी वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळेच शहरातील तसेच हद्दीबाहेरील करोनाबाधित रुग्णांना पालिकेच्या उपचारांचा निश्चित लाभ होतो आहे.

एकीकडे, असे चित्र असतानाच करोनाच्या नावाखाली संगनमत करणाऱ्यांनी वर्षभरापासून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा सपाटा लावला आहे. कृत्रिम श्वसनयंत्रणा सज्ज खाटा, प्राणवायू वितरण, प्राणवायू निर्मिती प्रकल्प, पीपीई कीट खरेदी, रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी, विविध प्रकारची औषधे, वैद्यकीय उपकरणे, कोविड सेंटर उभारणी, मनुष्यबळ भरती, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मामीटर व मुखपट्टी खरेदी, करोना चाचण्या, करोना रुग्णांसाठी जेवण व नाश्ता पुरवठा, संगणक खरेदी, वाहन व्यवस्था, मंडप उभारणी अशी विषयांची भली मोठी यादी आहे. ज्याद्वारे संगनमताने टक्केवारीचा मलिदा अनेक लाभार्थ्यांनी पदरात पाडून घेतल्याचे सांगितले जाते.

लोकप्रतिनिधी, अधिकाºयाच्या जवळचा ठेकेदार असणे, तो अघोषित भागीदार असणे, नातेवाईक किंवा कार्यकत्र्याच्या नावाने ठेका मिळवणे, स्व:प्रभाव वापरून इतरांना काम मिळवून देणे, बाजारपेठेतील दरांचा संदर्भ न घेता चढ्या दराने खरेदी करणे, मर्जीतील ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून अटी, शर्ती निश्चित करणे, मानांकन तपासून खरेदीप्रक्रिया पार न पाडणे, असे विविध प्रकार सर्रास होत असूनही त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केली जाते.र्

पिंपरी पालिकेत करोनाविषयक साहित्य, वस्तू, उपकरणे, औषधांची खरेदी नियमाप्रमाणेच होते. कोणालाही झुकते माप दिले जात नाही. इच्छुक संस्था निविदा भरतात. पात्र ठरणाऱ्यांना काम मिळते. तातडीच्या तथा अत्यावश्यक कामांसाठी थेट पध्दतीने कामे दिली जातात. संगनमताने काही होत असेल, असे बिलकूल वाटत नाही.  – मनोज लोणकर, भांडारप्रमुख / सहायक आयुक्त, पिंपरी पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:01 am

Web Title: involvement of all party people representatives officials contractors akp 94
Next Stories
1 विभागीय रुग्णालयांची कामे तातडीने पूर्ण करा!
2 अनावश्यक विकासकामे थांबवून लसीकरण करण्याची शिवसेनेची मागणी
3 मिळकतकरातून एप्रिलमध्ये पालिकेला १८८ कोटींचे उत्पन्न
Just Now!
X