पुणे : बाळाला स्तनपान देणारी आई आणि तिचे बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी आयोडिन हा घटक महत्त्वाचा आहे, असा निर्वाळा ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्टतर्फे  देण्यात आला आहे. बाळ एक ते दोन वर्षांचे होईपर्यंत त्याला स्तनपान मिळणे महत्त्वाचे आहे, तसेच बाळाची चयापचय क्रिया, शारीरिक वाढ आणि विकासावर नियंत्रण ठेवणाऱ्या थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती योग्य तऱ्हेने होण्यासाठी आई आणि बाळाच्या आहारातील आयोडिनचे प्रमाण महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

बाळाच्या जन्मानंतर पहिल्या एका तासात त्याला आईचे दूध मिळाले असता आरोग्यदायी आयुष्यासाठी आवश्यक असलेली अनेक पोषण मूल्ये बाळाला मिळतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. मात्र, हे स्तनपान बाळाला देणाऱ्या आईचा आहारही परिपूर्ण असावा, असे ग्लोबल न्यूट्रिशन अहवालाने स्पष्ट के ले आहे. स्तनपान देणाऱ्या आईचा आहार आयोडिनयुक्त मीठ असलेल्या पदार्थाचा योग्य वापर के लेला हवा, तसेच मासे आणि दुग्धजन्य पदार्थही आहारात घेणे आवश्यक आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

आहार तज्ज्ञ कविता देवगण म्हणाल्या, गरोदरपणात महिलेच्या शरीराची आयोडिनची गरज वाढलेली असते. नेहमीच्या आहारातून ती पूर्ण होण्याची शक्यता नसते. आयोडिनची कमतरता गर्भातील बाळाच्या मेंदूच्या विकासात अडथळा आणते. त्यामुळे प्रयत्नपूर्वक आयोडिनची कमतरता दूर करणे महत्त्वाचे आहे. गरोदरपणापूर्वी आणि गरोदर असताना आहार, जीवनशैली यांमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. चांगल्या प्रतीचा आहार, पुरेशी विश्रांती आणि ताणतणाव विरहित निरोगी आयुष्य हे गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे घटक आहेत. त्यांपैकीच महत्त्वाचा घटक म्हणजे आयोडिन हा होय, त्यामुळे गर्भवती महिलेने हे लक्षात ठेवावे. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेप्रमाणे गर्भवती महिलेने रोजच्या आहारात २५० मायक्रोग्रॅम इतके  आयोडिन घेणे आवश्यक असल्याचेही देवगण यांनी स्पष्ट के ले.

बाळाला स्तनपान के ल्यामुळे आईच्या शरीरातील अतिरिक्त कॅ लरी निघून जातात. स्तन आणि गर्भाशयाच्या कर्क रोगाचा धोका कमी होतो. तसेच आईच्या दुधातील प्रतिपिंडे बाळाला अनेक विषाणू आणि जीवाणूंविरुद्ध लढण्यासाठी तयार करतात, त्यामुळे स्तनपान हे आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.