पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दुसरे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बदलीची स्थानिक पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू होती. अखेर त्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी झाल्याचे आदेश गृह विभागाने काढले आहेत. दरम्यान, कृष्ण प्रकाश यांची आयर्नमॅन म्हणून विशेष ओळख आहे. दरम्यान, बिष्णोई हे कॅटमध्ये जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

20 सप्टेंबर 2019 ला आयुक्त संदीप बिष्णोई यांची नियुक्ती झाली होती त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 21 सप्टेंबर रोजी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाचा पदभार स्वीकारला होता. अवघ्या अकरा महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात त्यांना फारसे यश आल्याचे निदर्शनास आले नाही. अनेक अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल उघड नाराजी होती. दरम्यान, गेल्या महिन्यात राष्ट्रवादीच्या एका आमदाराने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पोलीस आयुक्तांविषयी नाराजी व्यक्त गेली होती. त्यानंतर त्यांच्या बदलीची जोरदार चर्चा स्थानिक पोलीस दलात सुरू झाली होती. याविषयीचे सर्वप्रथम वृत्त लोकसत्ता ऑनलाईनने दिले होते.

imran pratapgarhi congress, chandrapur congress pratibha dhanorkar
‘साऊथ मे भाजप साफ, नॉर्थ मे भाजप हाफ’, खासदार इमरान प्रतापगडी म्हणतात…
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Aditya Thackeray Yavatmal
‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती का महत्त्वाची?

कृष्ण प्रकाश यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार

दरम्यान, कृष्णप्रकाश हे 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात महत्त्वाची पदं सांभाळली आहेत. त्यांची 2012 मध्ये मुंबईत अतिरिक्त आयुक्त, दक्षिण विभाग म्हणून बदली झाली होती. सध्या महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महासंचालक (VIP सिक्युरिटी) याची वरिष्ठ IPS अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्यावर जबाबदारी होती. 2017 मध्ये फ्रान्स येथे आयोजित आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ट्रायथोलन रेस 14 तासात जिंकत नविन विश्व विक्रम कृष्णप्रकाश यांनी केला होता. त्या रेस मध्ये 186 किलोमीटर सायकलिंग, 42 किलोमीटर रनिंग आणि 4 किलोमीटर स्विमिंग हे अंतर अवघ्या 14 तासांत पूर्ण करत जागतिक विक्रम प्रस्थापित करून त्यांनी तिरंगा जगात सन्मानाने फडकविला होता.

पोलीस आयुक्त बदलीचा ‘तो’ स्क्रीन शॉर्ट अखेर खरा ठरला

12 ऑगस्ट रोजी एक पोष्ट (स्क्रिन शॉर्ट) व्हायरल झाला होता. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची बदली झाल्याचे म्हटले होते. अखेर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या जागी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती झाल्याचे स्पष्ट झाले.