16 February 2019

News Flash

पुण्यात आयटी इंजिनिअरची आत्महत्या

आयटी इंजिनिअरने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील हिंजवडी भागात राहणाऱ्या विद्यासागर पाथा या २५ वर्षीय आयटी इंजिनिअरने इमारतीवरून उडी मारून आपले आयुष्य संपवले. हिंजवडीच्या मेगापोलीश सोसायटीत ही घटना घडली. विद्यासागर पाथा हा मूळचा विशाखापट्टणम येथील होता. हिंजवडीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होता. त्याने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आपले आयुष्य संपवले.

विद्यासागर पाथाला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केले अशी माहिती पोलिसांनी दिली. विद्यासागर पाथाची सुसाइड नोटही पोलिसांना मिळाली आहे. मात्र आत्महत्येचे कारण काय आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यासागरचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

First Published on September 14, 2018 7:35 am

Web Title: it engineers suicide in hinjwadi pune