08 July 2020

News Flash

जगदीश शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द; राष्ट्रवादीला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यानंतर पद रद्द ठरवून पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

िपपरी पालिकेच्या चिंचवड रामनगर-विद्यानगर प्रभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्यानंतर सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने या प्रभागातील मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. शेट्टी यांचे पद रद्द ठरवून पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
पालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून शेट्टी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. जगदीश व उल्हास या शेट्टी बंधूंच्या निवडीस माजी खासदार गजानन बाबर, भाजपचे भीमा बोबडे यांनी आक्षेप घेतला होता. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जगदीश शेट्टी यांचा जातीचा दाखला रद्द ठरवून तो जप्त करण्याची कारवाई केली. महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी राज्य निवडणूक आयोगाला याबाबतची वस्तुस्थिती कळवून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. दरम्यान, शेट्टींना देण्यात आलेले फायदे परत घेण्याचे व पालिकेकडून देण्यात आलेली मानधनाची रक्कम वसूल करण्याचे आदेश महापालिकेने काढले. आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पाच मार्चपर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2016 3:37 am

Web Title: jagdish shetty corporatorpost cancelled
टॅग Corporators
Next Stories
1 पुस्तकप्रेमी वाचक असेपर्यंत टिकेकरांचे नाव कायम राहील – डॉ. द. ना. धनागरे
2 समाजमाध्यमांचा सुखी संसारात खोडा
3 रेल्वे स्थानकांवर चितारणार पुण्याची आधुनिक अन् सांस्कृतिक ओळख!
Just Now!
X