बाल गणेशाचे नृत्य आणि नारद मुनींच्या व्याख्यानाने ‘येळकोट येळकोट जय मल्हार ’ कार्यक्रम पुण्यात रंगला. जेजुरीत आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात येऊनही जेजुरीकरांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती.
झी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या ‘जय मल्हार’ मालिकेतील एखादा तरी कार्यक्रम जेजुरीत व्हावा, अशी मागणी जेजुरीकरांकडून होत होती. त्या पाश्र्वभूमीवर सोमवारी (दि. २९ फेब्रुवारी) या कार्यक्रमाचे आयोजन झी मराठी वाहिनीने जेजुरीत केले होते. तेथे मोकळ्या मैदानावर हा कार्यक्रम होणार होता. परंतु अवकाळी पावसामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. अखेर मंगळवारी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुण्यात कार्यक्रम असूनही जेजुरीकरांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती.
गणेशाच्या वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली, तर नारद मुनींनी मल्हारी आख्यान सांगितले. मालिकेतील खंडोबा, म्हाळसा, बाणाई, नारद, हेगडीप्रधान, लक्ष्मी, बाल गणेश यांच्या भूमिका साकारणारे कलाकार रंगमंचावर येताच उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष केला. या कार्यक्रमात ‘जय मल्हार’ मालिकेतील आत्तापर्यंतची गाणी, त्यावर आधारित नृत्ये सादर करण्यात आली.  कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘बानू बया’ या गाण्यावर सर्व कलाकारांनी ठेका धरला.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा