News Flash

सीसीटीव्ही बसविण्यासाठी दुसरे दाभोलकर घडण्याची वाट पाहणार का? – डॉ. हमीद दाभोलकर

सीसीटीव्ही बसविण्यासाठी आता दुसरे दाभोलकर घडण्याची वाट पाहणार का, असा सवाल डॉ. हमीद दाभोलकर यांनी मंगळवारी उपस्थित केला.

| May 21, 2014 02:45 am

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला नऊ महिने होऊनही शहरामध्ये सीसीटीव्ही बसले नाहीत. सीसीटीव्ही असते, तर डॉक्टरांचे मारेकरी सापडले असते. सीसीटीव्ही बसविण्यासाठी आता दुसरे दाभोलकर घडण्याची वाट पाहणार का, असा सवाल डॉ. हमीद दाभोलकर यांनी मंगळवारी उपस्थित केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जादूटोणाविरोधी कायद्याची सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी आणि या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेली जनसंवाद यात्रा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आली, त्या वेळी दाभोलकर बोलत होते. समितीचे अविनाश पाटील, श्रीपाद ललवाणी, नंदिनी जाधव, नाटय़दिग्दर्शक अतुल पेठे, लेखक मुकुंद टाकसाळे, प्रा. शमसुद्दीन तांबोळी उपस्थित होते.
या हत्येचा तपास हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) गेला असला तरी हा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी डॉ. हमीद दाभोलवर यांनी केली. सीबीआयकडे तपास गेला असला तरी राज्य सरकारने आपले तपास कार्य सुरू ठेवले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ज्या कायद्यासाठी डॉक्टरांनी हौतात्म्य पत्करले त्या कायद्याच्या प्रबोधनासाठी कार्यकर्त्यांनी स्वयंप्रेरणेने ८५ दिवसांची जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. २७ जिल्ह्य़ांचा प्रवास पूर्ण करून आज ही यात्रा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आली आहे. ही लढाई अवघड असली तरी कार्यकर्त्यांनी हार मानलेली नाही. दाभोलकर आणि चळवळीची बदनामी करण्यासाठी धर्माध शक्ती कार्यरत असून ही विवेकाची लढाई सक्षमपणे पुढे नेली जाईल.
यात्रेदरम्यान वकील आणि पोलिसांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. कार्यकर्ते अघोरी प्रकार आणि चमत्काराची प्रात्यक्षिके करून दाखवित आहेत, असे प्रशांत पोतदार यांनी सांगितले. या वेळी अविनाश पाटील, तांबोळी, टाकसाळे आणि पेठे यांनी मनोगत व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 2:45 am

Web Title: janasanwaad yatra by dr hameed dabholkar
Next Stories
1 पुण्यात ‘शाही’ विवाहसोहळे वाढता वाढता वाढे.!
2 महाविद्यालयांसाठीची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना कागदावरच
3 ठाकरे यांच्या तैलचित्रावरून पक्षनेत्यांच्या बैठकीत वादंग
Just Now!
X