पोलीस आयुक्तालयात तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्त त्यांच्या कक्षातच भेटणार आहेत. त्याबाबतचा आदेश त्यांनी नुकताच काढला आहे. यामुळे आयुक्तांशी वैयक्तिक पातळीवर आता तक्रारदारांना भेटता येणार आहे.
पोलीस आयुक्तालयामध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी दररोज सायंकाळी चार ते पाच दरम्यान जनता दरबार घेतला जात होता. या जनता दरबारात पोलीस आयुक्त स्वत: उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न समजून घेत होते. मात्र, पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी पदभार घेतल्यापासून ते जनता दरबारात आले नव्हते. मात्र, यापुढे पोलीस आयुक्त नागरिकांना थेट त्यांच्या कक्षातच भेटणार आहेत. ज्या वेळी पोलीस आयुक्त नसतील, त्या दिवशी सहपोलीस आयुक्त नागरिकांच्या समस्या ऐकून घेतील.