News Flash

बनावट कागदपत्रांच्या आधारे सीमकार्ड घेतल्याचे उडकीस

बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या मोबाइल सीमकार्डचा जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये वापर झाल्याचे उघड झाले असून, याबाबत दहशतवादविरोधी पथकाने दुसरा गुन्हा दाखल केला आहे.

| February 14, 2013 11:13 am

बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या मोबाइल सीमकार्डचा जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये वापर झाल्याचे उघड झाले असून, याबाबत दहशतवादविरोधी पथकाने दुसरा गुन्हा दाखल केला आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोघांना या गुन्ह्य़ात वर्ग करण्यात आले आहे. या दोघांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले.
फिरोज ऊर्फ हमजा अब्दुल हमीद सय्यद (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, पुणे) व इरफान मुस्तफा लांडगे (वय ३०, रा. मुकुंदनगर, जि. नगर) यांना या प्रकरणात पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांद्वारे मिळविलेल्या टाटा डोकोमो व एअरसेल या कंपन्यांच्या सीमकार्डची विक्री केल्याप्रकरणी यापूर्वी गणपत दामोदर गर्ग (वय ४२, रा. आदर्शनगर दिघी) व इक्बाल सादिक खान (वय ३१, रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली होती.
गर्ग यांची दिघी येथे दोन दुकाने आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी डोकोमो कंपनीचे १४० सीमकार्ड व ७८ जणांची छायाचित्रे तसेच मतदानकार्ड जप्त केले आहे. दिल्ली पोलिसांनी फिरोज व इरफान यांच्याकडे केलेल्या चौकशीत बॉम्बस्फोटामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या सीमकार्डचा वापर झाल्याची माहिती उघड झाली होती. ही कार्ड त्यांनी गर्ग व इक्बाल यांच्याकडून घेतली होती. या सीमकार्डचा वापर त्यांनी कुठे व कशाप्रकारे केला याबाबतचा तपास करण्यासाठी सरकारी वकील एस. एम. कदम यांनी आरोपींना पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 11:13 am

Web Title: jangali maharaj bomb blast case
Next Stories
1 शहरात पक्षाचे कार्य प्रभावीपणे पार पाडा- प्रा. विकास मठकरी
2 एक मार्चपासून प्रत्येक प्रभागात आधार कार्ड नोंदणी सुरू होणार
3 आधुनिकतेशी सुसंगत व्यवसायाची युवकांनी कास धरावी- डॉ. के. रोसय्या
Just Now!
X