News Flash

जानोरीकर संगीत भूषण पुरस्कार अशोक श्री. रानडे यांना जाहीर

गानवर्धन संस्थेतर्फे ज्येष्ठ पत्रकार आणि संगीत समीक्षक अशोक श्री. रानडे यांना पं. त्र्यंबकराव जानोरीकर संगीत भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

| July 8, 2014 02:55 am

गानवर्धन संस्थेतर्फे ज्येष्ठ पत्रकार आणि संगीत समीक्षक अशोक श्री. रानडे यांना पं. त्र्यंबकराव जानोरीकर संगीत भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भेंडीबाजार घराण्याचे बुजुर्ग गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या आणि ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केला असून गानवर्धन संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मनोहर मंगल कार्यालय येथे २६ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विद्याधर व्यास यांच्या हस्ते रानडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, डॉ. सुहासिनी कोरटकर आणि पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर या वेळी उपस्थित राहणार आहेत, असे संस्थेचे विश्वस्त प्रसाद भडसावळे यांनी कळविले आहे. १८ वर्षे संगीत मैफलींची विश्लेषणात्मक समीक्षा, कलाकारांच्या सांगीतिक वाटचालीसंदर्भातील लेख, विशेष मुलाखती, ‘नादयात्रा’ ही शास्त्रीय संगीतावरील विवेचनात्मक लेखमाला असे रानडे यांनी विपूल  लेखन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2014 2:55 am

Web Title: janorikar award to ashok ranade
Next Stories
1 रावसाहेब कसबे यांना ‘सुगावा पुरस्कार’
2 पीएमटी-पीसीएमटीचे विलीनीकरण म्हणजे सक्तीने लावलेले लग्न; ते मोडणारच!
3 कारवाईचा बडगा उगारूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संप सुरूच.
Just Now!
X