News Flash

देखाव्यातून ‘महाराष्ट्राची लोकधारा’ टिकवण्याचा जवळेकर कुटुंबाचा प्रयत्न

दीड महिन्याच्या कष्टाने उभारला देखावा

देखाव्यातून ‘महाराष्ट्राची लोकधारा’ टिकवण्याचा जवळेकर कुटुंबाचा प्रयत्न
सांगवी : जवळेकर कुटुंबियांनी सादर केलेला देखावा.

सध्याच्या आधुनिकतेच्या काळात महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांना आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. याची जाणीव असणाऱ्या सांगवीतील जवळेकर कुटुंबियांनी समाजाच्या प्रबोधनासाठी घरगुती गणपतीच्या देखाव्यातून ‘महाराष्ट्राची लोकधारा’ साकारली आहे.

जवळेकर कुटुंबियातील अभिषेक जवळेकर या तरुणाने तब्बल दीड महिना हा देखावा साकारण्यासाठी कष्ट घेतले. यासाठी त्याने २६ कापड्यांच्या बाहुल्या बनवल्यात त्यातील २२ बाहुल्या या हलत्या देखव्याचे दर्शन घडवतात. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, लोकनृत्य लावणी, वासुदेव, जागरण-गोंधळ, कोळी समाज, धनगर समाज, शेतकरी, शिवशाहीर अशी चित्रे त्याने या देखाव्याच्या माध्यमातून साकारली आहेत.

महाराष्ट्राची लोकधारा हा विषय मुलाने मांडावा असा अभिषेकच्या आई आणि वडिलांचा आग्रह होता. गेल्या कित्येक वर्षापासून घरगुती बाप्पापुढे देखावा सादर करण्याची जवळेकर कुटुंबात ही परंपरा आहे. यामुळे अभिषेकने हा पारंपरिक देखावा बाप्पा पुढे सादर केला आहे. पुढच्या पिढीला काही वर्षांनी या पारंपरिक लोकधारा केवळ पुस्तकात पाहायला मिळेल अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे जवळेकर कुटुंबाने पारंपरिक लोकधारा रुजवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 5:26 pm

Web Title: jawlekar family efforts to preserve lokdhara of maharashtra from the scene
Next Stories
1 ‘वॉटर कप’ स्पर्धेतील यशानंतर उत्साह आणखी दुणावला
2 गुजरात राज्यसभा निवडणूक: हायकोर्टाची अमित शहा, अहमद पटेलांना नोटीस
3 गुंगीचे औषध देऊन राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले
Just Now!
X