करोना विषाणू संसर्गामुळे के ंद्र शासनाकडून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अभियांत्रिकी प्रवेशांसाठीची जेईई मेन्स ही प्रवेश परीक्षा स्थगित के ली होती. आता ही परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

यंदा जेईई मेन्स ५, ७, ९ आणि ११ एप्रिलला घेण्यात येणार होती. मात्र, देशात करोना विषाणू संसर्ग वाढू लागल्याने केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक उपाय सुरू के ले. त्यात २१ दिवसांची संचारबंदी देशभर लागू करण्यात आली. त्यामुळे नियोजित जेईई मेन्स स्थगित करावी लागली. त्यामुळे आता जेईई मेन्स कधी होणार, त्या पुढे प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, एनटीएने जेईई मेन्सच्या आयोजनाबाबत माहिती देणारे परिपत्रक मंगळवारी संके तस्थळावर प्रसिद्ध के ले आहे.

परिस्थितीचा आढावा घेऊन जेईई मेन्स मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात प्रस्तावित आहे. पुढील काही आठवडय़ात परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. परीक्षेची प्रवेशपत्रे १५ एप्रिलनंतर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे  एनटीएने परिपत्रकात स्पष्ट के ले आहे.

विविध प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीही मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार हॉटेल मॅनेजमेंट, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातील (इग्नू) पीएच.डी आणि एमबीए, भारतीय कृषी संशोधन परिषद, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रवेश परीक्षा यांच्यासाठी ३० एप्रिल, यूजीसी नेटसाठी १६ मे, सीएसआयआर नेटसाठी १५ मे आणि अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेसाठी ३१ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिक माहिती  https://nta.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.