News Flash

ट्रम्प यांची निवड धोक्याची!

प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांचे मत

‘धिस वॉज ए मॅन’ या आपल्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर बुधवारी पुण्यात आले होते.

प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांचे मत

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष कधीच होणार नाहीत, असे आपले वाटणे ट्रम्प यांच्या झालेल्या निवडीने खोटे ठरले, असे मत प्रसिद्ध ब्रिटीश लेखक जेफ्री आर्चर यांनी व्यक्त केले. ‘‘अमेरिकन लोकांनी एका अशा व्यक्तीस निवडून दिले आहे जी कधी सिनेट सदस्य नव्हती, मेयर नव्हती किंवा त्यांनी कुठला कारभारही हाताळला नाही. ते आता जगातील सर्वात मोठा देश चालवणार आहेत. मला हे धोक्याचे वाटते,’’ असेही आर्चर म्हणाले.

‘धिस वॉज ए मॅन’ या आपल्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी बुधवारी पुण्यात आलेल्या जेफ्री आर्चर यांनी ट्रम्प यांच्या विजयापासून देशातील नोटाबंदीच्या निर्णयापर्यंत विविध विषयांवर भाष्य केले. पूर्वी राजकारणात राहिलेले आर्चर हे ट्रम्प यांच्याविषयी बोलताना म्हणाले,‘‘सर्व राजकारण्यांचा तिरस्कार करण्याची नवी मानसिकता जगभरात निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘मी राजकारणी नाही, मला मते द्या,’ असे म्हणणाऱ्याचा विजय होणार. अमेरिकनांनी एका अशा व्यक्तीस निवडून दिले आहे, जी कधी सिनेट सदस्य नव्हती, मेयर नव्हती. ते आता जगातील सर्वात मोठा देश चालवणार आहेत. माझ्या मते हे धोक्याचे आहे.’’

नोटाबंदीबद्दल विचारणा झाली असता आपल्याकडेही पाचशे आणि हजाराच्या बऱ्याच नोटा आहेत, असे आर्चर मिश्किलपणे म्हणाले. ‘नोटाबंदीच्या निर्णयाचा उपयोग झाला की नाही हे अजून एका वर्षांत दिसेल,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘धिस वॉज ए मॅन’ हे त्यांच्या ‘द क्लिफ्टन क्रॉनिकल सिरीज’ या पुस्तकांमधील सातवे आणि शेवटचे पुस्तक आहे. ‘मी लेखक नाही, गोष्टी सांगणारा- ‘स्टोरीटेलर’ आहे. भारतीयांना मुळातच गोष्टी सांगणाऱ्यांविषयी प्रेम आहे,’ असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 2:25 am

Web Title: jeffrey archer comment on donald trump
Next Stories
1 सव्वाचारशे वर्षांपूर्वीची ‘ज्ञानेश्वरी’ची प्रत प्रकाशात
2 ‘विल्सन्स डिसिज’वरील गोळ्यांचा तुटवडा संपवा’
3 दहावीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात चित्रपट, नाटय़, प्रसारमाध्यमांचाही समावेश
Just Now!
X