जेट एअरवेजने प्रवाशांकडून वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2018 पासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मार्गांवर 18 अतिरिक्त फ्रिक्वेन्सी सुरू करून आपले नेटवर्क सक्षम करायचे ठरवले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जेट एअरवेजने मुंबई आणि यूकेतील मँचेस्टर या दरम्यान देशातील पहिली नॉन-स्टॉप सेवा सुरू केली, आणि आता 1 डिसेंबरपासून कंपनी पुण्याहून सिंगापूरपर्यंत नॉन-स्टॉप सेवा सुरू करणार आहे.

पुण्याहून सिंगापूरला जाणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कंपनीकडून सिंगापूरशी कनेक्टिविटी अधिक वाढवण्यात येणार आहे. जेट एअरवेजची पुणे-सिंगापूर ही नवी सेवा मुंबई, दिल्ली व बंगळुरू या हबद्वारे सिंगापूरला दिल्या जाणाऱ्या सध्याच्या सेवेला पूरक ठरणार आहे. वाढते व्यवसाय व कॉर्पोरेट सेंटर आणि आघाडीचे शैक्षणिक केंद्र असणाऱ्या पुण्यासाठी ही नवी सेवा म्हणजे, विमानकंपनीचे शहरातून दुसरे आंतरराष्ट्रीय ठिकाण असणार आहे. सिंगापूरमार्गे आशिया-पॅसिफिक व ऑस्ट्रेलिया येथे जाणाऱ्या प्रवाशांनाही पुण्यातून सुरू होणारी ही नवी सेवा फायदेशीर ठरणार आहे. या प्रवाशांना, गरूडा इंडोनेशिया, जेटस्टार एशिया व कंटास अशा कंपनीच्या कोडशेअर व इंटरलाइन पार्टनर्सच्या सेवेच्या मदतीने पुढील प्रवास सुरळीत करता येईल. याशिवाय, जेट एअरवेज दिल्ली आणि नेपाळची राजधानी काठमांडू यादरम्यान चौथी दैनंदिन फ्रिक्वेन्सीही सुरू करणार आहे.