पुण्यात खाटांची कमतरता ; प्रशासनाची कबुली

पुणे : गेल्या चार आठवडय़ांचा विचार के ल्यास जुलैअखेपर्यंत शहरात तब्बल २७ हजार करोनाचे सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) रुग्ण असतील, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त के ली. सध्या शहरात १६ हजार ३०० सक्रिय रुग्ण असून येत्या आठ दिवसांत तब्बल दहा हजार ७०० रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, रुग्णांसाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांत पुरेशा खाटा उपलब्ध नाहीत, अशी धक्कादायक कबुली प्रशासनाने गुरुवारी दिली.

करोनाच्या सद्य:स्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्तालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील विविध करोना के ंद्रांत चार हजार साध्या खाटा उपलब्ध के ल्या असून खासगी रुग्णालयांपैकी इनलॅक्स बुधरानीमध्ये १०० वरून ३१० खाटा, रूबीमध्ये १५० वरून ४०० खाटा, तर ससून रुग्णालयात २२० वरून ८७० खाटा वाढवण्यात येत आहेत. ससूनमधील भाजलेल्या रूग्णांवर उपचार करणारा आणि मानसोपचार यांसारखे विभाग तात्पुरते बंद करून हे रुग्णालय १०० टक्के  करोनासाठी राखीव करण्यात येईल. त्याद्वारे एकटय़ा ससूनमध्ये एकू ण ९७० खाटा उपलब्ध होतील. सध्या शहरात २०६३ प्राणवायूचे, ५०९ अतिदक्षता, ३०० कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या खाटा आहेत.

याशिवाय मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे ६५० डॉक्टर सेवा देण्यास तयार आहेत. नर्सिग संघटनांकडून परिचारिका, तर दिशा, बीव्हीजी यांसारख्या कं पन्या आया आणि स्वच्छता कामगार पुरवणार आहेत. नवले रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसाठी जवळच निवासव्यवस्था के ल्यानंतर तेथील ४०० खाटा उपलब्ध होतील. शहरात एकू ण करोनाबाधितांपैकी २० टक्के  उपचार घेणारे रुग्ण पुणे सोडून इतर जिल्ह्य़ातील असल्याने शहरावर ताण येत आहे, असे राव यांनी सांगितले.

प्रशासनाचा अंदाजजुलैअखेर शहरात २७ हजार करोनावर उपचार घेणारे रुग्ण असतील. त्यापैकी २४ हजार रुग्णांना करोना काळजी केद्रात उपचार घ्यावे लागतील, तर तीन हजार इतर व्याधी किं वा गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना रुग्णालयांत अतिदक्षता, प्राणवायू किं वा कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज लागेल. त्याकरिता खासगी रुग्णालयातील एका पंचतारांकित (डिलक्स) खोलीमध्ये तीन खाटा ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत, असेही राव यांनी सांगितले.

१५ ऑगस्टपर्यंत ८०० खाटांचे करोना काळजी केंद्र

जुलैअखेरीस शहरात मोठय़ा प्रमाणात रुग्ण वाढणार असल्याने ८०० खाटांचे करोना काळजी के ंद्र कार्यान्वित होईल. त्यामध्ये ६०० प्राणवायूच्या, २०० अतिदक्षता खाटा असतील. त्याबाबतची निविदा प्रसिद्ध के ली असून येत्या दोन दिवसांत कार्यारंभ आदेश दिले जातील. त्यानुसार येत्या १५ ऑगस्टपर्यंत हे के ंद्र सुरू होईल, असेही राव यांनी स्पष्ट के ले.